विरोधी पक्षनेत्याविना विधिमंडळ: महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी चिंताजनक
( डॉ . विजयानंद बनसोडे ) लोकशाही म्हणजे केवळ बहुमताचा खेळ नसून , ती अल्पमतालाही सामावून घेणारी एक सर्वसमावेशक प्रक्रिया आहे . ही केवळ एक व्याख्या नसून , ती संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे . परंतु , महाराष्ट्रासारख्या वैभवशाली संसदीय परंपरा लाभलेल्या राज्यात सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ' विरोधी पक्षनेता ' नसणे , ही बाब लोकशाहीच्या आरोग्यासाठी नक्कीच चिंताजनक आणि निराशाजनक आहे . इंग्लंडची ' शॅडो कॅबिनेट ' आणि भारतीय वास्तव संसदीय लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाला ' शॅडो कॅबिनेट ' ( पर्यायी सरकार ) मानले जाते . भारतीय संविधानात ' विरोधी पक्षनेता ' या पदाचा थेट उल्लेख नसला , तरी हे पद संसदीय प्रणालीच्या प्रदीर्घ प्रथा आणि पूर्वपरंपरांतून आकाराला आले आहे . लोकशाही प्रक्रिया कितीही गुंतागुंतीची असली ,...